रविवार, ३ डिसेंबर, २०१७

माजी सरन्यायाधीश आदर्श सेन आनंद यांचे निधन - ४ डिसेंबर २०१७

माजी सरन्यायाधीश आदर्श सेन आनंद यांचे निधन - ४ डिसेंबर २०१७

* सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश २९ वे न्या आदर्श सेन आनंद यांचे १ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले. ते मानवी हक्काचे खंदे पुरस्कर्ते होते.

* घटनात्मक हक्क व गरिबांना न्याय साहाय्य यासाठी त्यांचा नेहमी आग्रह होता. जम्मू येथे १ नोव्हेंबर १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. ते जम्मू काश्मीर विद्यापीठातुन पदवीधर झाले.

* १९६४ मध्ये बार ऍट लॉची पदवी घेतल्यानंतर चंदिगढ येथे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात ते वकिली करीत होते.

* वयाच्या ३८ व्या वर्षी जम्मू काश्मीर उच्च न्यायालयात ते अतिरिक्त न्यायाधीश झाले. त्यानंतर त्याच न्यायालयात १९७६ मध्ये मुख्य न्यायाधीश झाले.

* १९८९ मध्ये मद्रास उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशाची बदली झाली. व नंतर ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश व नंतर सरन्यायाधीश झाले.

* २६ जानेवारी २००८ रोजी त्यांना पदमविभूषण हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान देण्यात आला. [दि कॉन्स्टिट्यूशन ऑफ जम्मू अँड काश्मीर इट्स डेव्हलोपमेंट अँड कमेंट्स] हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.