मंगळवार, २६ डिसेंबर, २०१७

विजय रुपाणी गुजरातचे नवे मुख्यमंत्री - २७ डिसेंबर २०१७

विजय रुपाणी गुजरातचे नवे मुख्यमंत्री - २७ डिसेंबर २०१७

* आज विजय रुपाणी यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

* विजय रुपाणी यांच्यासह एकूण २० जणांना राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ९ आमदार कॅबिनेट मंत्री आणि १० आमदार राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

* गुजरातमध्ये एकूण विधानसभा सदस्यांची संख्या १८२ आहे. म्हणजेच गुजरातमध्ये जास्तीत जास्त २७ आमदार मंत्रिमंडळात समाविष्ट करता येऊ शकतात.

* विजय रुपाणी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्ती मानले जातात. स्वछ प्रतिमेचे नेते म्हणूनही गुजरातच्या राजकारणात त्यांची ओळख आहे.

* गुजरातमध्ये १८२ जागेपैकी ९९ जागा भाजप, काँग्रेस ७७ जागा, बीटीपी २, अपक्ष ३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस १ जागा, निवडून आले आहेत. भाजपने सलग ६ व्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.