सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

विश्वकरंडक तिरंदाजीत दीपिकाला ब्राँझपदक - ५ डिसेंबर २०१७

विश्वकरंडक तिरंदाजीत दीपिकाला ब्राँझपदक - ५ डिसेंबर २०१७

* दीपिका कुमारीचे ब्राँझपदक सोडल्यास विश्वकरंडक इनडोअर तिरंदाजीच्या दुसऱ्या टप्प्याच्या स्पर्धेत भारताची पाटी कोरीच राहिली.

* बँकाँकला झालेल्या या स्पर्धेत आतानू दास दुसऱ्याच फेरीत पराजित झाला. तिसरे मानांकन मिळवलेल्या दीपिकाने ब्राँझपदकाच्या लढतीत रशियाच्या सयाना त्सेमपिलोवा हिला ७-३ असे हरविले.

* पहिला सेट २९-२९ असा बरोबरीत सुटल्यावर दीपिकाने त्यानंतरचे दोन सेट ३०-२७ या फरकानेच जिंकले. त्यानंतरचा सेट २८-२९ गमावला.

* पण अखेरचा पाचवा सेट ३०-२८ जिंकत ब्राँझ निश्चित केले. दीपिकाची या स्पर्धेतील लढती भारतीयांविरुद्धच झाल्या.

* तिने निवेता गणेशनला ६-० लैशराम बॉम्बबॉय देवी हिला ७-३, आणि अंकिता भकत हिला ६-२, असे नमविले. तिला उपांत्य फेरीत कोरियाच्या किम सुरीन हिने ५-५ बरोबरीनंतर शूटऑफनंतर १०-९ असे हरविले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.