रविवार, १० डिसेंबर, २०१७

जगात संत्रा उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर - ११ डिसेंबर २०१७

जगात संत्रा उत्पादनात भारत तिसऱ्या क्रमांकावर - ११ डिसेंबर २०१७

* जगातील संत्रा उत्पादनामध्ये भारताचा क्रमांक ३ रा आहे. निर्यातीमध्ये मात्र भारत पहिल्या दहातही नाही. एकूण उत्पादनाच्या केवळ १.१७% संत्रा सध्या भारतातून निर्यात होतो.

* संत्र्याचा समावेश लिंबूवर्गीय फळांत होतो. आखाती देश व युरोपात अशा लिंबूवर्गीय फळांची मागणी मोठी असते. हीच गरज ओळखून लॅटिन अमेरिकन देशांनी संत्र्याचे उत्पादन सुरु केले.

* आज अमेरिकेला लागणारा पूर्ण संत्रा ब्राझीलकडून पुरवला जातो. भारत मात्र पूर्वीपासून संत्रा उत्पादनात व निर्यातीतही क्षमता असूनही अव्वल होऊच शकला नाही.

* ब्राझीलने मात्र भारतानंतर उत्पादन घेणे सुरु करून आज तो अव्वल आहे. आज जगभरात ७.०९ कोटी लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन घेतले जाते. त्यापैकी १.६९ कोटी टन उत्पादन ब्राझीलमध्ये घेतल्या जाते.

* त्यापाठोपाठ चीनचा क्रमांक लागतो. व तिसरा क्रमांक भारताचा. भारतात दरवर्षी ७३ लाख टन लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन होते. यामध्ये संत्र्यासह लिंबू व मोसंबीचाही समावेश आहे.

* भारतात ७३ लाख टनांपैकी निव्वळ संत्र्याचे उत्पादन हे ४१ लाख टन आहे. त्याहून महत्वाची बाब ही की या ४१ लाख टन उत्पादन महाराष्ट्रात होते म्हणजे म्हणजे जवळपास ५०% उत्पादन होते.

* महाराष्ट्रातील संत्र्याचे पीक प्रामुख्याने नागपूर, अमरावती, अकोला, व वर्धा या जिल्ह्यात घेतले जाते. भारतात सर्वाधिक प्रसिद्ध संत्रा नागपूर अर्थात विदर्भातील मानला जातो.

* विदर्भातील संत्र्याचे महत्व ओळखून राष्ट्रीय बागायत शेती मंडळाने या संत्र्याला २०१४ मध्ये [भौगोलिक ओळख] जीआय दिली.

* भारतातील संत्रा निर्यात हा आखाती देश तसेच युरोपातील देशात मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. भारतातील संत्र्याची निर्यात कमी प्रमाणात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.