शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

शास्त्रज्ञाच्या मते अंडे शाकाहारी खादयपदार्थ - १ डिसेंबर २०१७

शास्त्रज्ञाच्या मते अंडे शाकाहारी खादयपदार्थ - १ डिसेंबर २०१७

* अंडे व्हेजिटिरियन की नॉन-व्हेज यावरून शाकाहारी आणि मांसाहारीमध्ये अनेकदा वाद झडत असतात. मात्र संशोधकांनी या दीर्घकालीन वादावर उत्तर शोधलं आहे. शास्त्रज्ञाच्या मते अंड हे शाकाहारी आहे. 

* अंड हे कोंबडी किंवा इतर पक्ष्याकडून म्हणजे सजीवांकडून मिळत असल्यामुळे ते नॉन व्हेजीटेरियन असल्याचा दावा मांसाहारीकडून केला जात असे. मात्र हा दावा शाश्त्रज्ञानी हा दावा खोडून काढला आहे. 

* संशोधकांच्या मते अंड्याचे तीन भाग असतात. अंड्याच कवच [एग्स शेल], पिवळा बलक [एग योक] आणि पांढरा भाग [एग व्हाईट]. पांढऱ्या भागात फक्त प्रथिनच असतात, तर पिवळा बलक हा प्रथिने, कोलेस्ट्रॉल आणि फॅक्टपासून बनला असून. 

* आपण जी अंडी दररोज खातो, त्यामध्ये गर्भ नसतो. त्यामुळे पक्षी किंवा प्राण्याची वाढ व्हावी, इतका जीवाचा विकास झालेला नसतो. 

* कोंबडी सहा महिन्यांची झाली, की दर दिवशी किंवा दोन दिवसातून एकदा अंडी देते. अंड देण्यासाठी नरासोबत तिचं मिलन होण्याची आवश्यकता नसते. 

* अशा अंड्यामध्ये जीव नसतो. आपण जी अंडी नेहमी बाजारातून विकत आणतो, ती अनफर्टिलाइज्ड असतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.