बुधवार, २० डिसेंबर, २०१७

भारताला कच्चे तेल पुरविण्यात इराक आघाडीवर - २१ डिसेंबर २०१७

भारताला कच्चे तेल पुरविण्यात इराक आघाडीवर - २१ डिसेंबर २०१७

* गेली अनेक वर्षे भारताला कच्चे तेल पुरविण्यात आघाडीवर असणाऱ्या सौदी अरेबियाची जागा इराकने हिरावून घेतली आहे.

* गेल्या तीन वर्षांमध्ये भारत आणि इराक या दोन्ही देशामधील संबंध वृद्धिंगत झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

* एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ या काळामध्ये इराककडून भारताने २५.८ दशलक्ष टन कच्च्या तेलाची आयात केली आहे.

* भारताला कच्चे तेल पुरविण्यात आजवर आघाडीवर असलेला सौदी अरेबिया या काळामध्ये २१.९% दशलक्ष टन इंधन पुरवू शकला तर इराणने १२.५ दशलक्ष टन कच्चे तेल भारताला पुरविले.

* इराकने गेल्या काही वर्षांमध्ये कमी दरामध्ये भारताला कच्चे तेल पुरविले आहे. त्याचाच परिमाण म्हणून भारताने मोठ्या प्रमाणात इराककडून इंधन आयात केली आहे. असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.