शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक - १ डिसेंबर २०१७

जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक - १ डिसेंबर २०१७

* भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक विक्रमासह जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. कर्णम मल्लेश्वरीनंतर अशी कामगिरी मीराबाई केवळ दुसरीच वेटलिफ्टर ठरली.

* अमेरिकेत ऍनाहोम येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मीराबाईने ऐकून १९४ किलो वजन उचलून जागतिक विक्रमाचीही नोंद केली.

* तिने स्नॅच प्रकारात ८५ आणि क्लीन अँड जर्क प्रकारात १०९ किलो वजन उचलले. तिने थायलंडच्या सुकचारोएन थुन्या हिला १९३ अवघ्या एका किलोने मागे टाकले. सेन्गुरा ऍना ब्राँझपदक मानकरी ठरली.

* गेल्या वर्षी रियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्या वेळी ४८ किलो वजनी गटात ती सर्वांगीण किमान कामगिरीपर्यंत पोचू शकली नाही. तेव्हा क्लीन अँड जर्क प्रकारात ती तीन प्रयत्नात साधे वजनही उचलू शकली नव्हती.

* भारताची आणखी एक आघाडीची खेळाडू कुंदरानी देवी हिने कारकिर्दीत अनेक पदके मिळविली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.