गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

COP-२३ ही जागतिक परिषद जर्मनी बॉन येथे संपन्न - २४ नोव्हेंबर २०१७

COP-२३ ही जागतिक परिषद जर्मनी बॉन येथे संपन्न - २४ नोव्हेंबर २०१७

* हवामान बदलाचे अरिष्ट टाळण्यासाठी उपाययोजनांची COP-२३ ही जागतिक परिषद बॉन जर्मनी इथे ६ ते १७ नोव्हेंबर रोजी पार पडली.

* भारताचाही या परिषदेत सहभाग होता. सहा वर्षाच्या वादानंतर शेतीमुळे होणारा घातक हवामान बदल अखेर परिषदेत मान्य झाला.

* मृदा आरोग्य संवर्धन, मृदा आणि मृदेची गुणवत्ता तसेच अन्नघटकांचे चलनवलन, खतांचे व्यवस्थापन, याविषयी उहापोह होऊन, २०२० च्या परिषदेत याचा आढावा घेण्याचे ठरले.

* १६ देशातील कार्बन उत्सर्जन प्रचंड वाढते आहे. यात प्रामुख्याने मेक्सिको, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, व ब्राझीलचा वाटा जास्त आहे.

* तुर्कस्थान, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, या देशाच्या कार्बन उत्सर्जन ९ ते १३ टक्क्यांनी वाढच होणार आहे. चीन मात्र उत्सर्जन कमी करण्यात आघाडीवर आहे.

* चीन कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत  १३ टक्क्यांनी गिगाटन इतके असेल तर भारतात ते ४.५ गिगाटन एवढे असेल.

* पॅरिस करारात ठरलेली राष्ट्रीय उद्दिष्ट्ये, प्रत्येक राष्ट्राने जरी तंतोतंत गाठली असली तरीही औद्योगिक क्रांती होण्याआधीच तापमानात अजूनही ३.२ अंश से इतकी धोकादायक वाढ होणारच आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.