मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

भारतातील भविष्यातील काही बदल - २९ नोव्हेंबर २०१७

भारतातील भविष्यातील काही बदल - २९ नोव्हेंबर २०१७

* डिजिटल व्यवहार करण्यास ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उज्जीवन बँकेने देशभरातील ५०० शाखांत ५०० तंत्र कौशल्य असलेल्या पदवीधारांची नियुक्ती केली.

* आता रेल्वेचे डिझेल इंजिनही इतिहासजमा होणार. भारतीय रेल्वेने सर्व मार्ग इलेकट्रीकवर चालविण्याची धडक मोहीम हाती घेतली असून इलेक्ट्रिक इंजिनाची खरेदी सुरु करण्यात आली आहे.

* स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमचा वापर यावर्षी ४४ वरून ३३ इतका कमी झाला आहे. डिजिटल व्यवहारामुळे एटीएमचा वापर कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

* ज्यावर्षी अन्नधान्याचे उत्पादन अधिक होईल. त्यावर्षी त्याचा उपयोग इथेनॉल उत्पादनासाठी करता येईल. असे धोरण सरकार आखत आहे. इथेनॉल वापर पेट्रोल आणि डिझेलमध्ये करण्यात येतो.  पण तो सध्या अनुक्रमे २ आणि ०.५ टक्के इतका कमी असून ते प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

* यावर्षी जुलै ते सप्टेंबर याकाळात देशात सौर ऊर्जेची निर्मिती २ हजार २४७ मेगावॅटने वाढली आहे. ती यावर्षी दुसऱ्या तिमाहीपेक्षा १५.४० टक्क्यांनी अधिक आहे.

* २०३० पर्यंत सर्व गाड्या इलेक्ट्रिकवर चालविण्याचे उद्दिष्ट सरकारने घेतले असून त्याचा एक भाग म्हणून सरकारने १००० इलेकट्रीक कार खरेदीची ऑर्डर खासगी कंपन्यांना दिली आहे.

* नव्याने येऊ घातलेल्या इलेकट्रीक गाडयांना चार्जिंग करण्यासाठी देशभर सारखेच चार्जिंग स्टेशन उभे करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

* त्यानुसार या गाडयांना कंपन्या वेगळ्या असल्या तरीही सर्वाना त्या स्टेशनवर आपली गाडी चार्ज करता करून घेता येईल.

* आज E-Learning, Android development, Artificial intelligence, Machine Learning, Front-end web developer, full stack developer, Self driving, Data analyst माहिती तंत्रज्ञान विषयात या आठ विषयांना भारतात सध्या सर्वाधिक मागणी नोंदविली जाते आहे.

* नव्या तंत्रज्ञानाचा वापराचे कौशल्य वाढावे आणि भारतीय तरुण रोजगाराभिमुख व्हावेत यासाठी गुगलने १ लाख ३० हजार तरुणांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.

* २०२० पर्यंत भारतात ५ जी तंत्रज्ञान उपलब्द व्हावे यासाठी सरकारने प्रयत्न सुरु करून त्यात त्यांनी कायदा तयार केला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.