गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात कर्नाटक प्रथम स्थानावर - १० नोव्हेंबर २०१७

औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात कर्नाटक प्रथम स्थानावर - १० नोव्हेंबर २०१७

* वेगाने वाढणारी अर्थव्यव्यस्था असणाऱ्या भारतामध्ये औद्योगिक गुंतवणुकीस आकर्षित करणारे प्रमुख राज्य म्हणून कर्नाटकाने बाजी मारली आहे. 

* कर्नाटकाने ४४.३% औद्योगिक गुंतवणूक करण्यात आली असून सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण १ लाख ४७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

* केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१७ वर्षात अनुक्रमे राज्याची स्थिती पुढीलप्रमाणे कर्नाटक १ लाख ४७ हजार ६२५ कोटी, गुजरात ६५,७४१ कोटी, महाराष्ट्र २५,०१८ कोटी, आंध्रप्रदेश २४,०१३ कोटी, तेलंगणा १२,५६७ कोटींची गुंतवणूक करण्यात यश मिळाले आहे. 

* कर्नाटक अनेक वर्षांपासून परकी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. व्यवसायिकांसाठी कर्नाटकाने सकल योजना राबविली आहे. 

* दरम्यान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक कर्नाटकापेक्षा तब्बल सात पटीने कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुजरातपेक्षाही महाराष्ट्र तिनपटीने कमी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.