मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

केंद्रातील मोदी सरकार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विश्वासू सरकार - २२ नोव्हेंबर २०१७

केंद्रातील मोदी सरकार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विश्वासू सरकार - २२ नोव्हेंबर २०१७

* वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार केंद्रातील मोदी सरकार हे जगातील विश्वासार्ह देशांच्या सरकारमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

* वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वाधिक विश्वासार्ह सरकारांची यादी तयार केली आहे. यामध्ये स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियातील सरकार अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.

* या अहवालानुसार भारतातील ७४% भारतीयांनी केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी फोरमने जगभरातील देशांची अर्थव्यवस्था तेथील राजकीय घडामोडी आणि भ्रष्टाचार मिटण्यासाठी उपायोजना यांचा निकष लावला.

* जगातील इतर देशांच्या तुलनेत ग्रीसची स्थिती जास्त भयावह आहे. या देशातील केवळ १०% नागरिकांनीच देशाच्या सरकारवर विश्वास ठेवला आहे.

* विश्वासार्ह सरकारच्या यादीमध्ये अनुक्रमे स्वत्झर्लंड, इंडोनेशिया, भारत, लक्झेम्बर्ग, नॉर्वे, कॅनडा, तुर्की, न्यूझीलँड, आयर्लंड, नेदरलँड, जर्मनी, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क, आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.