शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

१.३.१ पंचवार्षिक योजना कालावधीतीळ यश व अपयश आकडेवारी

१.३.१ पंचवार्षिक योजना कालावधीतीळ यश व अपयश आकडेवारी [विकासाचा दर]

* पहिली पंचवार्षिक योजना - अपेक्षित २.१- प्रत्यक्ष ३.६ 
* दुसरी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ४.५ - प्रत्यक्ष ४.३
* तिसरी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ५.६ - प्रत्यक्ष २.८ 
* चौथी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ५.७ - प्रत्यक्ष ३.३ 
* पाचवी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ४.४ प्रत्यक्ष ४.८
* सहावी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ५.२ प्रत्यक्ष ५.७
* सातवी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ५.० प्रत्यक्ष ६.०
* आठवी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ५.६ प्रत्यक्ष ६.८
* नववी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ६.५ प्रत्यक्ष ५.५
* दहावी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ८.० प्रत्यक्ष ७.८
* अकरावी पंचवार्षिक योजना - अपेक्षित ९.० प्रत्यक्ष ५.३

१.३.२ पंचवार्षिक योजनांचे मूल्यमापन 

* अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत परिस्थिती बदलली आहे. 
* औदयोगिक क्षेत्रातही विविधतापूर्ण उत्पादन शक्य झाले आहे. 
* स्वतंत्रप्राप्तीनंतरची पुष्कळ वर्षे भारताचा परदेश व्यापारशेष प्रतिकूल होता. 
* संशोधन आणि विकास नियोजन काळात सुधारणा झाली आहे. 
* भांडवली बाजार, नाणेबाजार यांचा नियोजन काळात विकास झाला आहे. 
* देशांतर्गत बचत आणि गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. 
* साक्षरतेचे प्रमाण नियोजन काळात १८.३३% वरून ५२% पर्यंत वाढले आहे. 
* नियोजन काळात राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 
* पायाभूत सेवा व सुविधा यांच्या प्रमाणात वाढ झाली. 
* २००० पासून उपखंडात एक प्रगत देश या दृष्टीने भारताकडे पहिले जात आहे. 

१.३.३ पंचवार्षिक योजनांचे अपयश 

* अपेक्षित उदिष्ट्ये साध्य करण्यात यश प्राप्त झाले नाही. विकासाचा दर प्रत्येक वेळी कमी राहिला. 
* दारिद्र्यनिर्मूलन, बेरोजगारी या क्षेत्रात यश प्राप्त झाले नाही.
* आर्थिक विकासाचे लाभ समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचले नाही.
* शहरीकरणाचे वाढते प्रमाण ही एक समस्यांच आहे.
* लोकसंख्यावर प्रभावी नियंत्रण राखण्यात आलेले अपयश हे सर्व समस्यांचे मूळ कारण आहे.
* काळाबाजार, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, या समस्यांनी नियोजन काळात अधिक गंभीर स्वरूप धारण केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.