शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

एस अँड पी कडून भारताचे मानांकन जैसे थे कायम - २५ नोव्हेंबर २०१७

एस अँड पी कडून भारताचे मानांकन जैसे थे कायम - २५ नोव्हेंबर २०१७

* मूडीजने अलीकडेच भारताच्या मानांकनात सुधारणा केली असली, तरी [स्टॅंडर्ड अँड पुअर्स] या संस्थेने भारताच्या पतमानांकनात या वेळी कोणतीही सुधारणा केलेली नाही.

* एस अँड पी कडून भारताचे [बीबीबी-] हे मानांकन कायम राखण्यात आले आहे. मानांकनात कोणतीही सुधारणा केली नसली तरीही भारतीय अर्थव्यवस्थेचा येणारा काळ चांगला असेल.

* एस अँड पी ने भारतीय अर्थव्यवस्थेचा स्थितीबद्दलचा अहवाल आज प्रसिद्ध केला. मूडीज नंतर एस अँड पी काय अहवाल सादर करतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

* मूडीजनंतर एस अँड पी काय अहवाल सादर करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. येत्या दोन वर्षात म्हणजेच २०१८ ते २०२० दरम्यान भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल.

* सध्या भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असून, भारताकडे असणाऱ्या परकीय गंगाजळीचा साठा येत्या काळात चांगला वाढेल. असे देखील मत नोंदविण्यात आले.

* एस अँड पी ने याआधी जानेवारी २००७ मध्ये भारताच्या मानांकनात सुधारणा केली होती. त्यावेळी संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ करून ते [बीबीबी-] केले होते.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.