सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी - २१ नोव्हेंबर २०१७

भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी - २१ नोव्हेंबर २०१७

* भारताचे दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

* ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवूड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे.

* आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांची नेमणूक होते. भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे.

* मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली.

* ११ फेरीत संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत न्या भंडारी पिछाडीवर होते. यासाठी १२ वी फेरी पार पडणार होती. मात्र त्यापूर्वीच ब्रिटनने माघार घेतली.

* भंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ साली झाला. वकिलीचा वारसा त्यांना आजोबा बी सी भंडारी आणि वडील महावीरचंद्र भंडारी यांच्याकडून मिळाला.

* त्यांनी राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठाकडून कायद्याची पदवी घेतली. अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कुल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळविली.

* वकिलीच्या क्षेत्रात २३ वर्षाच्या अनुभवानंतर त्यांना  १९९१ साली दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली.

* प्रथम १९७३ ते १९७६ साली या काळात राजस्थान हायकोर्टात वकिली केली. तिथून १९७७ मध्ये ते दिल्ली हायकोर्टात वकिली केली.

 * त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय आणि नंतर ऑकटोबर २००५ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.