सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

देशात दिल्लीत सगळ्यात जास्त प्लॅस्टिक कचरा - २८ नोव्हेंबर २०१७

देशात दिल्लीत सगळ्यात जास्त प्लॅस्टिक  कचरा - २८ नोव्हेंबर २०१७

* नवी दिल्ली येथील सेंटर फॉर सायन्स अँड इन्व्हॉयरमेंट [सीएसई] च्या अहवालानुसार देशात दिल्लीत सगळ्यात जास्त दररोज ६८९ टन प्लॅस्टिक कचरा फेकण्यात येतो.

* दिल्लीनंतर अनुक्रमे चेन्नई ४२९ टन, कोलकाता ४२५ टन, मुंबई ४०८ टन, बंगळुरू ३१३ टन, सुरत १४९ टन, पुणे १०१ टन, फरिदाबाद ७९ टन, इंदोर ६३ टन, नागपूर ४५ टन एवढा प्लॅस्टिक कचरा दररोज निर्माण होतो.

* देशात १५,३४२ प्लॅस्टिक टन कचरा रोज निर्माण होतो, त्यातील ९२०५ टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. ६,१३७ टन इतके प्रचंड प्लॅस्टिक प्रक्रियेविना पडून राहतो.

* सध्या तयार होणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्याभोवती निम्म्या कचऱ्यावर आपल्या देशात प्रक्रियाही होऊ शकत नाही. हा कचरा असाच वाढत चालला तर येत्या दहा वर्षात शहरामध्ये माणसांना प्लॅस्टिकशीच दोन हात करावे लागणार आहेत.

* सन २०१० मध्ये १९२ देशामधील किनारपट्टीवर २७५ दशलक्ष मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा जमा झाला होता. त्यापैकी ४.८ ते १२.७ मेट्रिक टन प्लॅस्टिक कचरा समुद्रात सोडला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.