बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा - १५ नोव्हेंबर २०१७

ज्येष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा - १५ नोव्हेंबर २०१७

* ७० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा द्या असे आदेश रिझर्व्ह बँकांना दिले आहेत.

* त्यामुळे आता ज्येष्ठ नागरिक व अंध अपंगांना रोख रकमेचा भरणा व अदागायी [पीक अप अँड डिलिव्हरी] चेकबुक आणि डिमांड ड्राफ्ट या सेवा घरपोच मिळतील.

* ज्येष्ठ नागरिक आणि अंध अपंगांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी त्यांना बँकांनी घरपोच सेवा उपलब्द करून देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

* ज्येष्ठ नागरिक आणि अंध अपंग यासह वैद्यकीय प्रमाणित जुनाट आजार अथवा शारीरिक अक्षमता असलेल्या व्यक्तींनाही या सेवेचा लाभ मिळेल.

* वरील श्रेणीत येणाऱ्या नागरिकांना रोख रकमेचा भरणा करण्यासाठी तसेच खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँक शाखेत जाण्याची गरज पडणार नाही.

* तसेच केवायसी आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना बँकेत जावे लागणार नाही. बँकेचे प्रतिनिधी त्यांच्या घरी येऊन संबंधित प्रमाणपत्र घेऊन जातील.

* या निर्देशांची अंमलबजावणी ३१ डिसेंबरपासून करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.