शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

मूडीज आर्थिक संस्थेने केली भारताच्या मानांकनात वाढ - १८ नोव्हेंबर २०१७

मूडीज आर्थिक संस्थेने केली भारताच्या मानांकनात वाढ - १८ नोव्हेंबर २०१७

* मूडीज या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानांकन संस्थेने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे १३ वर्षानंतर मूडीजने भारताच्या सुधारणा केली आहे.

* मूडीजने भारताचे क्रेडिट रेटिंग [Baa३] वरून [Baa२] केले आहे. विरोधकांकडून मोदी सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयावर टीका केली जात असताना मूडीजने सरकाराच्या या दोन्ही निर्णयांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

* मूडीजने भारतातील आर्थिक सुधारणा विचारात घेऊन रेटिंग्समध्ये सुधारणा केली आहे. गेल्या १३ वर्षांमध्ये मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली नव्हती.

* मात्र २००४ नंतर प्रथमच मूडीजने भारताच्या रेटिंग्समध्ये सुधारणा केली आहे. मूडीजकडून भारताला आतापर्यंत [Baa३] रेटिंग देण्यात आले होते. मात्र आता [Baa२] करण्यात आले होते.

* [Baa३] गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून निचचांकी दर्जा दाखवणारे रेटिंग आहे. याआधी मूडीजकडून २०१५ मध्ये रेटिंग्स वरून सकारात्मक करण्यात आले होते.

* आर्थिक सुधारणांसाठी पावले उचलण्यात आल्याने भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेची वाटचाल सकारात्मक असेल. यामुळेच भारताचे रेटिंग वाढवण्यात आले आहे.

* अर्थव्यवस्थेतील सुधारणांचा फायदा बुडीत खात्यात गेलेल्या कर्जांना होईल. अर्थविषयक सुधारणांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत होईल.

* यामुळे सरकारी कर्जाचे ओझे हळूहळू कमी होऊ शकेल. असे मूडीजने म्हटले आहे. कर्जाच्या ओझ्याच्या देशाच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असल्याचा धोक्याचा इशाराही मूडीजने दिला आहे.

* [ मूडीजचे महत्व ]

* मूडीज हे इन्व्हेस्टर सर्व्हिसेस ही एक मूडीज कोर्पोरेशनची उपकंपनी आहे. ती कर्जरोख्याचे मानांकन ठरविण्याचे काम करते.

* जागतिक स्तरावर असे काम करणाऱ्या तीन प्रमुख कंपन्यांपैकी ही एक प्रमुख कंपनी आहे. तिचे मुख्यालय अमेरिकेत आहे.

* अन्य दोन कंपन्या स्टॅंडर्ड अँड पुअर आणि फीच यांचा समावेश होतो. या कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या मानांकनावर संस्थात्मक गुंतवणूकदार लक्ष ठेवत असतात आणि त्यानुसार कर्जरोख्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

* भारताचे मानांकन उंचावल्याने देशाला आणि देशाच्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय बाजारातून कमी दराने कर्ज उपलब्द होऊ शकेल.

* मानांकन सुधारल्याने परदेशी भांडवलाचा ओघ भारताकडे वाढण्यास मदत होऊ शकेल. माध्यम कालावधीत भारताच्या आर्थिक विकासाच्या, प्रगतीच्या आशा उंचावल्या आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.