गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

जागतिक पोषण आहार अहवाल [भारत] - १० नोव्हेंबर २०१७

जागतिक पोषण आहार अहवाल [भारत] - १० नोव्हेंबर २०१७

* भारतातील १५ ते ४९ वयोगटातील ५१% महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्याची माहिती [जागतिक पोषण आहार अहवाल २०१७] या अहवालातून समोर आली आहे.

* गेल्यावर्षी याच अहवालानुसार भारतात हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या महिलांमध्ये प्रमाण ४८% होते. यंदा ते ३ टक्क्यांनी वाढून ५१ टक्के झाले आहे.

* भारतासह १४० देशातील महिला आणि मुलांच्या आरोग्य विषयक समस्यांच्या आधारे, कुपोषणाच्या समस्येवर भाष्य करणारा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

* या सर्वेक्षणातील तीन मुद्दे - अविकसित आणि कुपोषित मुलांचे प्रमाण, माता होण्याच्या काळात महिलांमध्ये दिसून येणारी रक्ताच्या कमतरतेची समस्या, अधिक वजन असलेल्या वयोवृद्ध महिला.

* अहवालातील मुद्दे

* ५ वर्षाखालील ३८% मुलांची योग्य पद्धतीने वाढ झालेली नाही.
* पोषक आहार न मिळाल्याने मुलांची मानसिक उंची कमी राहण्याचे प्रमाणही जास्त.
* पोषक आहाराअभावी मुलांच्या मानसिक क्षमतेवरही परिणाम.
* ५ वर्षाखालील जवळपास २१% मुलांच्या उंचीच्या तुलनेत त्यांचे वजन कमी आहे. म्हणजे त्यांची बॉडी मास इंडेक्स अयोग्य.
* माता होण्याच्या वयातील ५१ टक्के महिलांमध्ये रक्ताची कमतरता.
* २२ टक्क्याहून अधिक वयोवृद्ध महिलांचे वजन अधिक.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.