शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

काही विशेष नवीन चालू घडामोडी - २५ नोव्हेंबर २०१७

काही विशेष नवीन चालू घडामोडी - २५ नोव्हेंबर २०१७

* नासा अंतराळ संस्थेने आपल्या मंगळ २०२० मिशन यासाठी पॅराशूट परीक्षण श्रुंखला ऍडव्हॅन्डस सुपरसॉनिक पॅराशूट इन्फ्लेक्शन रिसर्च प्रयोगाचा पहिले परीक्षण सुरु केले.

* भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो वर्ष २०१९ ते २०२० पर्यंत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय मिशन अंतर्गत [आदित्य-L1] सुरु करण्याच्या प्रयत्नांत आहे.

* प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व सेवांसाठी असणारे परिपूर्ण एकच असे [UMANG] अँप सादर केले आहे. हे भारताच्या १३ भाषेत उपलब्द असून यातून राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवा उपलब्द करून देण्यात आल्या आहेत.

* दहा दिवस चालणारा मणिपूरचा महत्वाचा संगई महोत्सवाचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.

* यंदाचे राज्यस्तरीय ३१ वे पक्षीमित्र संमेलन ठाण्यात भरत असून २५ आणि २६ नोव्हेंबरला होणार आहे.

* युनायटेड नेशन्स च्या मते लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन हे क्षेत्र महिलांसाठी जगातील सगळ्यात हिंसक क्षेत्र आहे.

* ५ वी जागतिक सायबर स्पेस संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचा विषय [ सायबर फॉर ऑल : ए सिक्योर अँड इन्क्युसीव्ह सायबर स्पेस फॉर सस्टेनेबल डेव्हलोपमेंट हा होता.

* केंद्रीय कॅबिनेटने १५ व्या वित्त आयोगाची स्थापना दिली असून या वित्त आयोगाच्या सर्व शिफारशी १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ पर्यंत लागू करण्यात येणार आहेत.

* भारत जगातला दुसरा सगळ्यात मोठा मासेमारी उत्पादक देश बनला असून हे यश मासेमारी उत्पादनासाठी वापरण्यासाठी घेण्यात आलेल्या [ब्लु क्रांती] चे फलित होय.

* मुंबई विद्यापीठाच्या भूषण गगरानी मुंबई यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.

* भारताचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपतींचे निवासस्थान अर्थात राष्ट्रपती भवन सर्वसामान्य जनतेसाठी आता आठवड्यातून चार दिवस खुले राहणार आहे.

* केंद्रीय मंत्रालयाने युरोपियन बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलोपमेंट [EBRD] मधील भारताच्या सदस्यतेला मंजुरी दिली आहे.

* अफगाणिस्तानने क्रिकेट खेळातील अंडर-१९ आशिया चषक २०१७ जिंकला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला.

* निसर्गाचा समतोल राखण्यासाठी येत्या पाच महिन्यात म्हणजे गुडीपाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.