गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

एन. के. सिंग १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - ३० नोव्हेंबर २०१७

एन. के. सिंग १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - ३० नोव्हेंबर २०१७

* माजी संसदीय सभासद आणि महसूल सचिव एन. के. सिंह यांना १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्ह्णून नियुक्त केले गेले आहे. त्यांचा कार्यकाळ ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत असेल.

* आयोगाचे अन्य सभासद म्हणजे वित्त मंत्रालयाचे माजी सचिव शक्तिकांत दास, माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिडी, नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद आणि जॉर्जटाऊन विद्यापीठामधील प्रा अनुप सिंह हे आपला अहवाल ऑक्टोबर २०१९ पर्यंत सादर करतील.

* १५ वा वित्त आयोग १ एप्रिल २०२० पासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी आपल्या शिफारशी प्रदान करणार. वित्त आयोगाची स्थापना हे संविधाच्या कलम २८० नुसार एक नियतकालिक कायदेशीर बंधन आहे.

* यापूर्वी १९ एप्रिल २०१५ पासून पाच वर्षाच्या कालावधीसाठी शिफारशी करण्यासाठी १४ वे वित्त आयोग स्थापन केले गेले.

* आयोगाने १५ डिसेंबर २०१४ पर्यंत आपला अहवाल सादर केला. १४ व्या आयोगाच्या शिफारशी आर्थिक वर्ष २०१९ पर्यंत वैध असतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.