शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

जीएसटीच्या महत्वाच्या बैठकीत १७८ वस्तू २८% वरून १८% च्या स्लॅबमध्ये - ११ नोव्हेंबर २०१७

जीएसटीच्या महत्वाच्या बैठकीत १७८ वस्तू २८% वरून १८% च्या स्लॅबमध्ये - ११ नोव्हेंबर २०१७

* वस्तू व सेवा कराच्या जीएसटी दराबाबत विरोधक आणि उद्योजकांच्या होणाऱ्या टीकेमुळे केंद्र सरकरने शुक्रवारी जीएसटीच्या दारात मोठे बदल झाले आहे.

* जीएसटीची महत्वाची बैठक ही गुवाहाटी आसाम येथे घेण्यात आली. बैठकीत दैनंदिन वापरातील १७८ वस्तूवरील जीएसटी २८ टक्क्यांऐवजी १८ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आली.

* ही सुधारित जीएसटी १५ नोव्हेंबरपासून लागू होईल. एकूण सुमारे दोनशे वस्तूवरील कर कमी करण्यात आला.

* या वस्तू होणार स्वस्त शाम्पू, टूथपेस्ट, चॉकलेट, डिटर्जंट, शु पॉलीश, ग्रॅनाईट, मार्बल, सौन्दर्य प्रसाधने, न्यूट्रीशनल ड्रिंक, शेव्हिंग क्रीम, आणि लोशन, पेंट्स, सिमेंट, वॉशिंग मशीन, एसी, इत्यादी वस्तू २८ वरून १८ टक्क्यावर ठेवण्यात आल्या.

* यापूर्वी पंचतारांकित हॉटेलमधील मुक्कामासाठी २८% जीएसटी द्यावा लागत होता. आता सरकारने हॉटेलसाठी एकाच श्रेणी केली असून सरसकट १८% कर कक्षेत समावेश करण्यात आला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.