शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

भारताची मनुषी छिल्लरला २०१७ चा मिस वर्ल्ड किताब जाहीर - १९ नोव्हेंबर २०१७

भारताची मनुषी छिल्लरला २०१७ चा मिस वर्ल्ड किताब जाहीर - १९ नोव्हेंबर २०१७

* भारताची २१ वर्षीय मनुषी छिल्लरने २०१७ चा मिस वर्ल्ड किताब आपल्या नावावर केला आहे. तिने दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, इंडोनेशिया,  आणि फिलिपाइन्सच्या सौन्दर्यवतींना मागे टाकून हा किताब पटकावला.

* चीनमध्ये आज सायना येथे झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी जवळपास १३० देशातून सौदंर्यवतीना सहभागी करण्यात आले होते.

* २०१६ मधील मिस वर्ल्ड प्यूटो रिकोची स्टेफनी डेल वेली विश्व सुंदरीचा २०१७ चा किताब मनुषीला प्रदान करेल. २० वर्षाची मनुषी ही दिल्लीची राहवासी असून ती मेडिकलची विद्यार्थिनी आहे.

* मिस मेक्सिको दुसऱ्या स्थानावर तर मिस इंग्लड तिसऱ्या स्थानावर राहली. १७ वर्षानंतर कोण्या भारतीय युवतीला हा किताब मिळाला आहे. याच्या आधी २००२ साली प्रियांका चोप्राला मिस वर्ल्ड किताब जाहीर झाला होता.

* मनुषीचा जन्म ७ मे १९९७ साली दिल्ली येथे झाला. स्पर्धेत मनुषीला विचारलेला एक प्रश्न असा होता की, कोणत्या प्रोफेशनला जास्त पगार मिळायला पाहिजे आणि का? असा प्रश्न मनुषीला विचारला असता यावर तिचे उत्तर होत, की सर्वात जास्त मान आईला मिळायला हवा. जिथपर्यंत पगाराचा विषय आहे, तर पगार पैशानी नाही, तर सन्मान आणि प्रेमाने दिला पाहिजे.

* भारताला आतापर्यंत पहिला किताब रिटा फरिया १९६६, ऐश्वर्या रॉय १९९४, डायना हेडन १९९७, युक्ता मुखी १९९९, प्रियांका चोप्रा २०००, आणि आता २०१७ चा मनुषी छिल्लर हिला प्रदान करण्यात आला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.