मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

राज्य शासनाचा तमाशा क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार मधुकर नेराळे यांना जाहीर - २९ नोव्हेंबर २०१७

राज्य शासनाचा तमाशा क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार मधुकर नेराळे यांना जाहीर - २९ नोव्हेंबर २०१७

* राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार मधुकर पांडुरंग नेराळे यांची निवड करण्यात आली.

* तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख, मानपत्र, आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

* मधुकर नेराळे यांचा वडिलोपार्जित तमाशा थिएटर आहे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून तमाशासोबत नेराळे हे जुळून आहेत.

* सन १९६९ साली स्वतःचे जसराज थिएटर स्थापन करून या संस्थेमार्फत गाढवाचं लग्न, आतून कीर्तन वरून तमाशा, राजकारण गेलं चुलीत, उदे ग अंबे, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र, काजळी अशा प्रसिद्ध नाट्याचे सादरीकरण त्यांनी केले.

* १९९० ते १९९६ पर्यंत ते सांस्कृतिक संचालनालय तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांना या क्षेत्राच्या कार्याबद्दल उल्लेखनीय पुरस्कार मिळाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.