शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०१७

इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ल्यात २३५ नागरिक ठार - २५ नोव्हेंबर २०१७

इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ल्यात २३५ नागरिक ठार - २५ नोव्हेंबर २०१७

* इजिप्तच्या सिनाई प्रांतात शुक्रवारच्या नमाजाला लोक मशिदीत जमले असताना दहशतवादी हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात आणि केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २३५ लोक ठार झाले आहे. आणि १२० हुन अधिक लोक गंभीर झाले आहे.

* हा दहशतवादी हल्ला इसिसने घडवून आणला असावा, असा संशय आहे. लोक नमाज पढत असतानाच हा हल्ला करण्यात आला. इजिप्त सरकारने तीन दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

* अल-अरिश शहरातील रवाडा मशिदीमध्ये नमाजाच्या वेळी दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला. नमाजाच्या वेळी मशिदीमध्ये गर्दी असल्यानं एकच पळापळ झाली.

* या स्फोटात व हल्ल्यात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशहतवादी संघटनेनं जबाबदारी घेतली नाही.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.