रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

सौदी अरेबियात आजपर्यंतची सर्वात मोठा भ्रष्ठाचारविरोधी मोहीम - ६ नोव्हेंबर २०१७

सौदी अरेबियात आजपर्यंतची सर्वात मोठा भ्रष्ठाचारविरोधी मोहीम - ६ नोव्हेंबर २०१७

* सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनवारी आजी माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. 

* अटक झालेल्यामध्ये ट्विटर आणि अँपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालिद बिन तलाल यांचाही समावेश आहे. 

* गेल्याच आठवड्यात सलमान यांच्या अध्यक्षतेखाली सौदी सम्राटांनी भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. 

* सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुतैब बिन अब्दुल्लाह यांनाही बरखास्त करण्यात आले आहे. 

* सौदी अरेबियाच्या सरकारी प्रेसमध्ये एजन्सीने म्हटले आहे की सार्वजनिक मालमत्ता वाचविणे, भ्रष्ट लोकांना दंडित करणे हे आयोगाचे लक्ष्य आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.