बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

ओडिशात देशातील पहिले लष्करी संग्रहालय - ९ नोव्हेंबर २०१७

ओडिशात देशातील पहिले लष्करी संग्रहालय - ९ नोव्हेंबर २०१७

* आतापर्यंत युद्धे आणि अंतर्गत संघर्षांमध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रसंपदेचे भारत सरकार जतन करणार असून ओडिशातील चंडीपूर देशातील पहिले लष्करी संग्रहालय उभारण्यात आले आहे.

* लोकांना संरक्षण खात्याची माहिती व्हावी आणि भारतीय सैनिकांची युद्धामध्ये केलेल्या असीम त्याग आणि बलिदानाची त्यांना आठवण करून देण्यासाठी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे.

* संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे [DRDO] अध्यक्ष एस ख्रिस्तोफर यांच्या हस्ते या परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या या संस्थांचे उदघाटन करण्यात आले आहे.

* प्रत्यक्ष क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि अन्य शस्त्रांच्या चाचण्यांचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी हे संग्रहालय खुले राहणार आहे.

* येथील अधिकारीच भेट देणाऱ्यांसाठीचे दिवस ठरवून देणार आहेत. भारतीय हवाई दल आणि नौदलाकडून वापरण्यात आलेली एकूण १४ शस्त्रे या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे.

* संग्रहालयात खालील शस्त्रसंपदा असेल.

* डब्लू एम १८ हे रॉकेट लाँन्चर, १०५ एमएम ची फिल्ड गन, ५७ एम एम ची अँटी टॅंक गन, ४० एमएम ची लाईट गन या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे.

* या सर्व शस्त्रांचा भारतीय नौदल आणि लष्कराने विविध युद्धामध्ये वापर केला आहे. या सर्व शस्त्रांचा भारतीय नौदल आणि लष्कराने विविध युद्धामध्ये वापर केला आहे.

* याद्वारे आमच्या जवानांचा त्याग भावी पिढ्याना कळावा म्हणून हे संग्रहालय उभारण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. संरक्षणशास्त्रांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या संग्रहालयाचा मोठा लाभ होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.