बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

ज्येष्ठ अभिनेत्री श्यामा यांचे निधन - १५ नोव्हेंबर २०१७

ज्येष्ठ अभिनेत्री श्यामा यांचे निधन - १५ नोव्हेंबर २०१७

* ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री श्यामा यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत वयाच्या ८२ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ पुत्र आणि एक कन्या आहे.

* श्यामा यांचा खरे नाव खर्शीद अख्तर असे होते. दिग्दर्शक विजय भट्ट यांनी चित्रपटासाठी त्यांचे नामकरण श्यामा असे केले होते.

* गुरुदत्त यांच्या आरपार या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडदयावर पदार्पन केले. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या बरसात की रात आणि आरपार या चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांची बरीच प्रशंसा झाली.

* बॉलिवूडमधील चार दशकांच्या कारकिर्दीत श्यामा यांनी सुमारे १७५ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. शारदामध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.