गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

भारतीय नौदलाच्या पहिल्या वैमानिकाचा मान शुभांगी स्वरूपला - २४ नोव्हेंबर २०१७

भारतीय नौदलाच्या पहिल्या वैमानिकाचा मान शुभांगी स्वरूपला - २४ नोव्हेंबर २०१७

* भारतीय हवाई दलानंतर आता भारतीय नौदलातही पहिली महिला वैमानिक म्हणून शुभांगी स्वरुप हिची निवड करण्यात आली आहे.

* शुभांगी स्वरूप मूळची उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. कुन्नूर येथील जवळच असलेल्या एझिमला नौदल अकॅडमीत नव्याने प्रशिक्षित कॅडेट्सना दीक्षांत समारोह पार पडला.

* प्रशिक्षण काळात दाखवलेल्या तयारीच्या जोरावर शुभांगी स्वरूप हिची वैमानिक शाखेसाठी निवड करण्यात आली. तसेच आस्था सैगल, रूपा ए आणि शक्ती माया यादेखील नौदलाच्या शस्त्रागार निरीक्षक विभागात अधिकारी बनलेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

* याखेरीज नौदलाच्या सेवेत इतकी वर्षे केवळ पुरुष काम करीत असलेल्या आणखी एका शाखेतही महिलांना प्रथमच प्रवेश मिळविला आहे. यामुळे महिलांना आता अजून एक नवे क्षेत्र मिळाले.

* हैद्राबाद येथील हवाई दल अकादमीत अधिक प्रगत प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शुभांगी नौदलाच्या टेहळणी विमानाचे स्वारस्थ करेल.

* शुभांगीचे वडील ज्ञान स्वरूप नौदलात कमांडर पदावर आहेत. या निवडीने शुभांगी व तिच्या वडिलांची जणू स्वप्नपूर्ती झाली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.