बुधवार, ८ नोव्हेंबर, २०१७

हिमाचल प्रदेशमध्ये आज विधानसभेच्या ६८ जागेसाठी मतदान - ९ नोव्हेंबर २०१७

हिमाचल प्रदेशमध्ये आज विधानसभेच्या ६८ जागेसाठी मतदान - ९ नोव्हेंबर २०१७

* हिमाचल प्रदेश विधानसभा ६८ जागेसाठी आज गुरुवारी मतदान होत आहे. सर्व ६८ मतदारसंघात पारंपरिक भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत आहे.  ६२ विद्यमान आमदारांसह एकूण ३३७ उमेदवार मतदारांचा कौल मागत आहेत.

* मुख्यमंत्री विरभद्रसिंग, दहा मंत्री, आठ सदस्यीय सचिव, उपसभापती जगत सिंह नेगी, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल आणि डझनच्यवर माजी मंत्र्यांचे भवितव्य मतदार ठरवतील.

* सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप सर्व ६८ जागा लढवत असून बहुजन समाज पक्ष ४२, मार्क्सवादी पक्ष १४ अशा सर्व पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहे.

* हिमाचल प्रदेशमध्ये २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६८ जागेपैकी ३६ काँग्रेसने आणि २७ भाजपने जिंकल्या होत्या.

* त्यामुळे भाजपासाठी पुढच्या महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकांसोबत हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीचे महत्व वाढणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल १८ डिसेंबर रोजी जाहीर होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.