रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

भारतातील काळ्या पैशासंदर्भात स्वित्झर्लंडच्या संसदीय समितीच्या कराराला मंजुरी - २० नोव्हेंबर २०१७

भारतातील काळ्या पैशासंदर्भात स्वित्झर्लंडच्या संसदीय समितीच्या कराराला मंजुरी - २० नोव्हेंबर २०१७

* कुठल्याही भारतीयाने स्विस बँकेत पैसा जमा केल्यास त्याची आकडेवारी थेट भारत सरकारला मिळणार आहे. यात त्यांची खाजगी मालमत्ता आणि त्याने दिलेले कर या सर्व बाबीची माहिती सुद्धा उपलब्द होणार आहे.

* यामुळे करबुडव्या भारतीयांनी स्विस बँकांमध्ये दडविलेला काळा पैसा हुडकता येणार आहे. एकप्रकारे काळा पैसा आणण्याच्या दिशेने मोदी सरकारचे आणखी एक पाऊल पडले आहे.

* स्वित्झर्लंडच्या संसदीय समितीने एका अत्यंत महत्वाच्या कराराला मंजुरी दिली आहे. हा करार पूर्णपणे मंजूर झाल्यास भारताला स्विस बँकेत भारतीयांकडून जमा होणाऱ्या पैश्यांची रियल टाइम आकडेवारी मिळणार आहे.

* या कराराला ऑटोमॅटिक इन्फॉर्मेशन एक्सेंज पॅक्ट असे नाव देण्यात आले. या कराराचा केवळ भारतीयांनाच नाही तर इतर ४० देशांना फायदा होणार आहे.

* २०१८ पर्यंत हा करार प्रत्यक्षात उतरणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही त्याची अंमलबजावणी २०१९ पूर्वी होणे शक्य नाही.

* यामुळे स्विस बँकेत जमा होणारा नेमका पैसा काळा आहे की पांढरा आणि तो नेमका कुणाचा आहे याची सर्वस्वी माहिती भारताकडे उपलब्द होणार आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.