शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

चीनच्या [सी ९१९] प्रवासी विमानाचे यशस्वी उड्डाण - ११ नोव्हेंबर २०१७

चीनच्या [सी ९१९] प्रवासी विमानाचे यशस्वी उड्डाण - ११ नोव्हेंबर २०१७

* चीनने विकसित केलेल्या सी ९१९ या प्रवासी विमानाने प्रथमच लांब पल्ल्याचे यशस्वी उड्डाण केले. आता हे विमान हवाई प्रवास प्रमाणपत्र मिळविण्याच्या टप्प्यावर आल्याचे चीनमधील उत्पादकांनी म्हटले आहे.

* बोईंग कंपनीचे ७३७ आणि एअरबसचे ए ३२० या प्रवासी विमानांशी स्पर्धा करण्यासाठी चीनने सी ९१९ ची निर्मिती केली आहे.

* [कमर्शियल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन ऑफ चायना] या कंपनीने म्हटले आहे की सी ९१९ या विमानाने शांघाय ते मध्य चीनमधील शियान शहरापर्यंत लांब पल्ल्याचे यशस्वी उड्डाण केले आहे.

* हे अंतर १ हजार ३०० किलोमीटर अधिक असून हे विमान ७ हजार ८०० मीटर २५ हजार ९९० फूट उंचीपर्यंत गेले होते.

* प्रवासी विमान निर्मिती क्षेत्रात पाय रोवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम चीनने आखला असून यातीलच एक भाग म्हणून याचा एक भाग आहे.

* बोईंग आणि एअरबसची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी चीनने पावले उचलली आहेत. या प्रकारच्या २२ विमानासाठी आताच उत्पादकाकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.