शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

१०० अब्ज डॉलर संपत्तीसह अमेझॉनचे जेफ बेजॉस जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती - २६ नोव्हेंबर २०१७

१०० अब्ज डॉलर संपत्तीसह अमेझॉनचे जेफ बेजॉस जगातील दुसरी श्रीमंत व्यक्ती - २६ नोव्हेंबर २०१७

* ईकॉमर्स क्षेत्रातील जायंट मानल्या जाणाऱ्या अमेझॉनचे संस्थापक आणि अमेझॉनचे सीईओ जेफ बेजॉस यांनी संपत्तीच्या बाबतीत बिल गेट्स यांचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.

* ब्लॅक फ्रायडे सेल्सनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये २% वाढ झाल्याने संपत्ती १००.३ अब्ज डॉलर [सुमारे ६ लाख ४६ हजार ५७५ कोटी] झाली आहे.

* १०० डॉलर कोटीहून अधिक संपत्ती असणारी जेफ बेजॉस ही दुसरी व्यक्ती ठरली आहे. याआधी १९९९ साली मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी या विक्रमाची नोंद केली होती.

* बिल गेट्स, जेफ बेजॉस आणि तिसऱ्या क्रमांकावर वॉरेन बफेट असा जगातील श्रीमंतांचा क्रम तयार झाला आहे.

* बेजॉस हे पहिल्यांदा १९९८ साली फोर्ब्सच्या ४०० सर्वात श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले होते. आणि आता ते अव्वल स्थानी आले आहेत.

* सात महिन्यापूर्वीच त्यांनी अमानसियो ओर्टिगो आणि वॉरन बफेट यांना मागे सारत बेजॉस जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.