शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

मुंबईतील चार स्मारकांना युनेस्कोचा पुरस्कार - ३ नोव्हेंबर २०१७

मुंबईतील चार स्मारकांना युनेस्कोचा पुरस्कार - ३ नोव्हेंबर २०१७

* युनेस्कोने प्रतिवर्षीप्रमाणे आशिया पॅसिफिक देशातल्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या स्मारकांच्या पुरस्काराची घोषणा केली. त्यात भारतातील ७ स्मारक स्थळांचा तर मुंबईतील ४ स्थळांचा समावेश आहे.

* आशिया पॅसिफिक क्षेत्रात सांस्कृतिक वारसास्थळांचा विकास आणि संवर्धनासासाठी स्थानिक जनता व खासगी क्षेत्रातील संस्थांना युनेस्कोतर्फे दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते.

* या योजनेचा भाग म्हणून दरवर्षी निवडक स्मारक स्थळांना सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो.

* युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मुंबईतील ज्या ४ स्मारक स्थळांचा समावेश आहे. त्यात भायखळ्याचे ख्रिस्त चर्च, चर्नी रोडजवळचे रॉयल ऑपेरा हाऊस या दोन स्थळांचा विशेष गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला.

* बोमनजी होरमजी वाडिया फाउंटन अँड क्लॉक टॉवर तसेच वेलिंग्टन फाउंटन या दोन वारसास्थळांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.