सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

अमेरिकेतील विद्यार्थ्यात भारतीय चीननंतर दुसऱ्या स्थानी - १४ नोव्हेंबर २०१७

अमेरिकेतील विद्यार्थ्यात भारतीय चीननंतर दुसऱ्या स्थानी - १४ नोव्हेंबर २०१७

* अमेरिकेत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यात भारताने १२.३ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे. या विद्यार्थ्यात चीननंतर भारत दुसरा सर्वात मोठा गट झाला आहे.

* २०१६ च्या देशाच्या अर्थव्यवस्थेत या गटाने ६.५ अब्ज डॉलरचे योगदान दिले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या अहवालानुसार २०१६-१७ या वर्षात भारताचे १,८६,२६७ विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहोत.

* भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या १७.३% आहे. चीनने यात ६.८ टक्क्यांनी वाढ नोंदविली आहे.

* अमेरिकेत महाविद्यालये आणि विद्यापीठात दहा लाख विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत होते. हा आकडा नंतर १०.८५ लाखावर पोहोचला आहे.

* अमेरिकेत अध्ययन करणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यात चीन, भारत, दक्षिण कोरिया, सौदी अरब, कॅनडा, व्हिएतनाम, तायवान, जपान, मेक्सिको आणि ब्राझील येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.