गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०१७

महाराष्ट्राचे पहिले महाखादी विक्री व प्रोत्साहन केंद्र पुण्यात सुरु - १७ नोव्हेंबर २०१७

महाराष्ट्राचे पहिले महाखादी विक्री व प्रोत्साहन केंद्र पुण्यात सुरु - १७ नोव्हेंबर २०१७

* महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील पहिले  महाखादी विक्री आणि प्रोत्साहन केंद्र पुण्याच्या शिवाजीनगर भागामध्ये सुरु करण्यात आले आहे.

* कृषी महाविद्यालयाच्या आवारातील हातकागद संस्थेमध्ये हे केंद्र असून तेथे खादी आणि इतर हस्तकौशल्याच्या वस्तूंची विक्री होणार आहे.

* ग्रामीण अर्थकारण सक्षम करायचे असेल तर तेथे असलेल्या कौशल्याना आणि कारागिरांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे गांधीजी सांगत असत.

*  महाखादी हा ब्रँड म्हणून विकसित व्हावा आणि तो आंतरराष्ट्रीय पातळीवर जावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

* खादीला पूर्वी फक्त राजकारण्यांचा पेहराव अशी ओळख होती. मात्र आता खादी हे स्टेटस सिम्बॉल ठरत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.