शुक्रवार, १० नोव्हेंबर, २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१७

काही नवीन चालू घडामोडी - ११ नोव्हेंबर २०१७

* हैद्राबादमध्ये २० वा भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. 

* केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते ग्रेटर नोएडा येथे ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७ या काळात [ऑरगॅनिक वर्ल्ड काँग्रेस-२०१७] ही परिषद भरविण्यात आली. 

* युनेस्कोच्या रचनात्मक शहरांचे नेटवर्क या यादीत तामिळनाडूची राजधानी चेन्नई या शहराचा समावेश करण्यात आला आहे. 

* भारतीय रेल्वेने ६ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या पहिल्या गोल्ड स्टॅंडर्ड म्हटल्या जाणाऱ्या स्वर्ण ट्रेनचे अनावरण केले आहे. याचे नाव दिल्ली काठगोदाम शताब्दी एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले. 

* भारतीय गोल्फपटू शिव कपूरने ७ व्या पॅनासॉनिक ओपन २०१७ ही गोल्फ स्पर्धा जिंकून भारतात त्याचा पहिला एशियन टूर किताब जिंकला. 

* जर्मनीच्या बॉन शहरात ६ नोव्हेंबर २०१७ पासून युनायटेड फ्रेमवर्क कन्वेशन ऑन क्लायमेट चेंज [UNFCCC] च्या COP -२३ परिषदेला सुरुवात झाली. 

* इस्त्रायलच्या दक्षिण प्रांतामध्ये इस्त्रायली वायुदलाने आयोजित केलेल्या ब्लु फ्लॅग या लष्करी सरावामध्ये भारतासह नऊ देशांनी सहभाग घेतला आहे.

* अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे.

* देशात पहिल्यांदा नाशिक येथे क्रायोजेनिक्स तंत्रज्ञानाद्वारे राबविण्यात आलेल्या उपक्रमातून दुग्ध उत्पादनात वाढ झाल्याचा दावा संबंधित क्षेत्रातील तज्ञानी केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.