रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

डॉ मनमोहन सिंग यांना २०१७ चा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर - २० नोव्हेंबर २०१७

डॉ मनमोहन सिंग यांना २०१७ चा इंदिरा गांधी पुरस्कार जाहीर - २० नोव्हेंबर २०१७

* शांताता, निशस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदा माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली.

* इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट तर्फे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार जाहीर केला जातो. सन २००४ ते सन २०१४ अशी सलग १० वर्षे पंतप्रधान राहून भारताची शान जगात उंचावल्याबद्दल सिंग यांना पुरस्कार देण्यात आला.

* राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळाने डॉ मनमोहन सिंग यांची निवड केल्याने, ट्रस्टचे चिटणीस सुमन दुबे यांनी एका जाहिरातीद्वारे जाहीर केले आहे.

* १० वर्षाच्या पंतप्रधान कारकिर्दीत भारताच्या आर्थिक सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे.

* शेजारी व जगातील इतर महत्वाच्या देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि धर्म, जात, भाषा व पंथ यांचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या खुशालीसाठी व सुरक्षितेसाठी सतत झटणे यासाठी डॉ मनमोहनसिंग यांना गौरविण्यात आले.

* सलग ५ वर्षांचे दोन कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ सिंग हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत. अमेरिकेसोबत झालेला नागरी अणू सुरक्षा करार व कोपनहेगन येथे झालेला जागतिक हवामान बसलाविषयीचा समझोता ही त्याची भरीव कामगिरी आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.