रविवार, १९ नोव्हेंबर, २०१७

झिम्बॉबेत सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले - २० नोव्हेंबर २०१७

झिम्बॉबेत सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले - २० नोव्हेंबर २०१७

* झिम्बॉबेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना सत्ताधारी झेडएनयू पीएफ पक्षाच्या प्रमुखपदावरून पदच्युत करण्यात आले. सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदावरून हटविण्यात आल्यामुळे मागील ३७ वर्षे सुरु असलेल्या मुगाबे पर्वाची अखेर झाली. 

* झिम्बॉबेतील राजकीय संकट अधिक गंभीर बनले आहे. लष्कराने कारवाई करत मुगाबे आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. 

* अध्यक्ष मुगाबे यांनी स्वतःहून पायउतार व्हावे अशी लष्कर आणि काही नेत्यांची मागणी होती. त्यास मुगाबे यांनी नकार दिला म्हणून झिम्बॉबेत राजकीय संकट व उलथापालथ तयार झाली. 

* सत्ताधारी झेडएएनयुच्या पीएफ पक्षाच्या केंद्रीय समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली. या बैठकीत पक्षाचे उपाध्यक्ष ख्रिस मुत्सेवांगा यांनी सांगितले की मुगाबे यांनी पायउतार होऊन शक्य तितक्या लवकर देश सोडून जावे. 

* ख्रिस मुत्सेवांगा यांनी १८ महिन्यापूर्वीच मुगाबे हटाव मोहीम हातात घेतली आहे. मुगाबे यांच्या पश्चात स्थापन केल्या जाणाऱ्या अंतिम सरकारच्या प्रमुखपदाच्या शर्यतीत ख्रिस मुत्सेवांगा हे आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.