गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

सुनील मित्तल यांच्याकडून समाजासाठी ७ हजार कोटी संपत्ती दान - २४ नोव्हेंबर २०१७

सुनील मित्तल यांच्याकडून समाजासाठी ७ हजार कोटी संपत्ती दान - २४ नोव्हेंबर २०१७

* फक्त पैशाची श्रीमंती असून चालत नाही माणसाकडे मनाची श्रीमंती देखील असावी लागते. एअरटेलचे सुनील मित्तल यांनी ७ हजार कोटीची संपत्ती दान करून खऱ्या अर्थाने श्रीमंतीचे दर्शन घडविले आहे.

* आपल्या एकूण संपत्तीमधील १०% भाग म्हणजे तब्बल ७ हजार कोटी रुपये सामाजिक कामासाठी दान करणार असल्याची घोषणा त्यांनी गुरुवारी केली आहे.

* तसे एअरटेल कंपनीचे स्वतःचे ३ टक्के शेअर्सही सामाजिक उपक्रमाच्या खर्चासाठी देण्यात येणार आहेत. भारती फाउंडेशनच्या माध्यमातून ही समाजसेवा केली जाणार आहे.

* समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या तरुण मुलांना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून त्यांनी [सत्य भारती विश्वविद्यापीठ] स्थापन करण्याची घोषणा केली आहे. २०२१ साली हे विद्यापीठ सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे.

* या विश्वविद्यापीठात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमावर जास्त भर दिला जाणार आहे. १० हजार विद्यार्थी यातून शिक्षण घेणार आहेत.

* काही दिवसापूर्वी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांनीदेखील आपली संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.