शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

स्त्री पुरुष आर्थिक समानतेत भारत जगात १०८ व्या स्थानावर - ३ नोव्हेंबर २०१७

स्त्री पुरुष आर्थिक समानतेत भारत जगात १०८ व्या स्थानावर - ३ नोव्हेंबर २०१७

* स्त्री पुरुष आर्थिक समानतेत भारत जगात १०८ व्या स्थानावर आहे मागच्या वर्षी तो ८७ व्या क्रमांकावर होता.

* वर्ल्ड इकॉनमिक फोरम ने जारी केलेल्या जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक २०१७ या अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे.

* या यादीत आइसलँड, नॉर्वे, व फिनलँड या देशांचे स्थान अव्वल असून, ४७ व्या क्रमांकावर असलेला बांगलादेश दक्षिण आशियात सर्वात वरच्या स्थानावर आहे.

* या वर्गवारीत भारताची घसरण ही आरोग्य आणि जीवनमान आणि महिलांचा आर्थिक सहभाग आणि त्यांना उपलब्द संधी या दोन निर्देशांकामुळे झाली आहे.

* आरोग्याच्या बाबतीत स्त्री पुरुष असमानतेत भारत १४१ व्या स्थानावर म्हणजे शेवटून चौथा होय. स्त्रीभ्रूणहत्या आणि मुलाच्या जन्माच्या आग्रह यामुळे ही असमानता वाढत असल्याचे मत या अहवालात आहे.

* महिलांच्या आर्थिक सहभागसंबंधातील निर्देशांकात भारत १३६ व्या स्थानावरून १३९ व्या स्थानावर आला आहे. भारतात कामाचे स्वरूप आणि परिश्रम या दोन्हीत समानता असूनही स्त्रीला कमी मेहताना मिळतो.

* या बाबतीत भारताचे स्थान केवळ प्रचंड लैंगिक विषमता असणाऱ्या इराण, येमेन, सौदी अरेबिया, पाकिस्तान व सीरिया यांच्या वरती आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.