सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

पनामा पेपर्स नंतर आता पॅराडाईज पेपर्स प्रकरण - ७ नोव्हेंबर २०१७

पनामा पेपर्स नंतर आता पॅराडाईज पेपर्स प्रकरण - ७ नोव्हेंबर २०१७

* १८ महिन्यापूर्वी पनामा पेपर्ससदंर्भात खुलासा करणाऱ्या जर्मनीत सूददॉइश झायटुंग या वृत्तपत्राने काळा पैशासंदर्भातील एक नवा गौप्यस्फोट केला आहे.

* या वृत्तपत्राने पॅराडाईज पेपर्स उजेडात आणले असून यासाठी ९६ नामांकित माध्यम समूहांनी मिळून पॅराडाईज पेपर्सचा खुलासा करण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

* पॅराडाईज पेपर्समध्ये १.३४ कोटी दस्तऐवजाचा समावेश आहे. या खुलाशाद्वारे बनावट कंपन्यांबद्दल माहिती समोर आली आहे.

* ज्याद्वारे जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यातील मंडळी आपला पैसा परदेशात पाठविण्यासाठी वापर करत होते. पॅराडाईज पेपर्स मध्ये भारतातील ७१४ जणांचा समावेश आहे.

* पनामा पेपर्स घोटाळ्यासह आता पॅराडाईज पेपर्स घोटाळा उघडकीस आला आहे. पॅराडाईज पेपर्स मध्ये बोगस कंपन्यांचा खुलासा करण्यात आला आहे.

* यात भारतातील दिग्गज नेते सिनेसृष्टीतील अभिनेते, कलावंत आणि मोठे उद्योजक, अशा ७१४ भारतीयांचा समावेश आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.