सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

तामिळ अभिनेत्री त्रिशा युनिसेफची दूत म्हणून नियुक्त - २१ नोव्हेंबर २०१७

तामिळ अभिनेत्री त्रिशा युनिसेफची दूत म्हणून नियुक्त - २१ नोव्हेंबर २०१७

* तामिळ अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिला आज युनिसेफ कडून सेलिब्रिटी ऍडव्होकेटचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

* लहान मुलांच्या अधिकाऱ्याबाबत ती तरुण पिढीत जागरूकता निर्माण करेल. असे युनिसेफने म्हटले आहे.

* युनिसेफ कडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ही मागणी देण्यात आली आहे. रक्तक्षय, बालविवाह, आणि लहान मुलांचे शोषण आदी प्रश्नावर जागृती करण्याचे काम अभिनेत्री त्रिशा करणार आहे.

* तामिळनाडूला कुपोषणमुक्त आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी आपण सरकारच्या प्रयत्नांना मदत करणार असल्याचे अभिनेत्री त्रिशाने सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.