रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७

तामिळनाडूचे मुक्त व्यंगचित्रकार जी बाला यांना अटक - ६ नोव्हेंबर २०१७

तामिळनाडूचे मुक्त व्यंगचित्रकार जी बाला यांना अटक - ६ नोव्हेंबर २०१७

* तामिळनाडूच्या तिरुनेवेलीमध्ये मुक्त व्यंगचित्रकार जी बाला यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

* तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी, नेल्लाईचे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यावर टिका करणारे व्यंगचित्र जी बाला यांनी काढले.

* या व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांसह इतर दोघांचीही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि याचमुळे जी बाला यांना अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

* बाला यांना ज्या व्यंगचित्रासाठी अटक करण्यात आली, ते व्यंगचित्र त्यांच्या फेसबुक पेजवरही पोस्ट करण्यात आले आहे.

* मात्र त्यांच्या अटकेनंतर फेसबुकपेजही हटविण्यात आले होते. बाला यांच्या मते यंत्रणेतील त्रुटी दाखवण्यासाठी हे व्यंगचित्र त्यांनी काढले होते.

* बाला यांनी हे व्यंगचित्र २४ ऑक्टोबर रोजी पोस्ट केले होते. ३८ हजार लोकांनी हे व्यंगचित्र शेअर केले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.