बुधवार, १ नोव्हेंबर, २०१७

मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्य दर्जा प्रदान - २ नोव्हेंबर २०१७

मुगाच्या खिचडीला राष्ट्रीय खाद्य दर्जा प्रदान - २ नोव्हेंबर २०१७

* मुगाची खिचडी आता राष्ट्रीय खाद्य म्हणून घोषित होणार आहे. येत्या ४ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या खाद्य दिनी मुगाच्या खिचडीला हा दर्जा प्रदान करण्यात येईल.

* केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं दिलेल्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. श्रीमंत असो वा गरीब मुगाची खिचडी सर्वानाच आवडते.

* त्यामुळेच या पदार्थाला सुपरफूडचा दर्जा मिळाला आहे. ४ तारखेला खिचडीला राष्ट्रीय भोजन जाहीर करताना त्याची पाककृतीही दाखवली जाणार आहे.

* इतकच नाही, खिचडी आरोग्यासाठी गुणकारी असल्यानेही हा निर्णय घेण्यात आला आहे. डाळ, तांदूळ, आणि कमीत कमी मसाल्यामध्ये तयार होणारी डिश असल्याचं म्हटलं जात.

* मुगाची खिचडी ही चविष्ट, कमी वेळात आणि खर्चात तयार होत असल्यानं तिला हा दर्जा मिळत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.