शनिवार, ४ नोव्हेंबर, २०१७

महाराष्ट्राचे अन्न प्रक्रिया धोरण जाहीर - ५ नोव्हेंबर २०१७

महाराष्ट्राचे अन्न प्रक्रिया धोरण जाहीर - ५ नोव्हेंबर २०१७

* महाराष्ट्राचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे शेती क्षेत्रात विक्रमी गुंतवणूक वाढवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राचे अन्न प्रक्रिया धोरण २०१७ जाहीर केले आहे.

* महाराष्ट्राला अन्न प्रक्रिया उद्योगाचे गंतव्य स्थान बनविणे, प्रतिवर्षी या उद्योगाचा दुहेरी आकड्यात विकास करणे या उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवून येत्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे.

* या क्षेत्रात जवळपास ५ लाख कौशल्यआधारित मनुष्यबळ निर्माण करणे. सकस आहारातून कुपोषणाच्या समस्येवर मात करणे आदी महत्वाचे उद्दिष्ट या धोरणात ठेवण्यात आले होते.

* या उद्योगाच्या विकासासाठी राज्यात औद्योगिक विकास महामंडळच्या वतीने फूड पार्क, वाईन पार्क, फ्लोरिकल्चर पार्क उभारण्यात आले होते.

* राज्यात काजू, आंबा, संत्री, टोमॅटो, मसाले, भात, दाळी, सोयाबीन वरील प्रक्रिया उद्योगासाठी विविध क्लस्टर उभारण्यात आले आहे.

* राज्यात ३५ पेक्षा अधिक वायनरी असून त्यासाठी १,५०० एकरावर द्राक्ष लागवड केली जाते. अन्न प्रक्रिया उद्योगाला पूरक अशा १८५ तांत्रिक संस्था राज्यात उपलब्द आहेत.

* केंद्र शासन योजनेतून मेगा फूड पार्क उभारण्यासाठी भांडवल उपलब्द करून देण्यात आले आहेत. केंद्राकडून राज्यात मोठ्या प्रमाणात शीतगृहांची उभारणी करण्यात आली आहे.

* खाजगी अन्न प्रक्रिया उद्योग युनिट उभारणीसाठी केंद्र शासनाने नाबार्डच्या मदतीने २००० कोटीचे भांडवल उपलब्द करून दिले आहे.

* अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी कामगार कायदा, वीज व पाणी पुरवठा, प्रदूषण नियंत्रण, कौशल्य विकास, महिला उद्योजकांना सहभाग वाढविणे, सौर ऊर्जा निर्मितीची सुविधा उपलब्द करून दिले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.