सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सत्येंद्र सिंगला सुवर्णपदक - ७ नोव्हेंबर २०१७

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत सत्येंद्र सिंगला सुवर्णपदक - ७ नोव्हेंबर २०१७

* सत्येंद्र सिंगने भारताच्या संजीव राजपूतला मागे टाकत राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेतील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 

* ब्रिस्बेनला झालेल्या या स्पर्धेत भारताने एकंदर सहा सुवर्णपदकासह वीस पदकांची घवघवीत कमाई केली. स्पर्धेच्या सांगतादिनी झालेल्या स्पर्धेत संजीवनप्रमाणेच चैन सिंगही अंतिम फेरीस पात्र ठरला होता. 

* सुरवातीस चैनसिंग तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे भारताच्या निर्विवाद वर्चस्वाची अपेक्षा होती. पण पुरुषाच्या ट्रॅप स्पर्धेत बिरेंदर सोधीला अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्याचेच समाधान लाभले. 

* या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण, सात रौप्य आणि सात ब्राँझपदकासह २० पदके जिंकली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.