मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

व्हीटी-एनएमडी या भारताच्या पहिल्या बनावटीच्या विमानाला राज्याचा परवाना जाहीर - २२ नोव्हेंबर २०१७

व्हीटी-एनएमडी या भारताच्या पहिल्या बनावटीच्या विमानाला राज्याचा परवाना जाहीर - २२ नोव्हेंबर २०१७

* महाराष्ट्रीयन तरुण अमोल यादव यांनी बनविलेल्या पहिल्या भारतीय बनावटीच्या विमानावर तब्बल १७ वर्षानंतर विमान वाहतूक संचालनालय [डीजीसीए] ने मान्यतेची मोहोर उमटवली आहे.

* या विमानाला व्हीटी-एनएमडी असे नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. येत्या १० दिवसात डीजीसीएचे अधिकारी विमानाची तपासणी करणार आहेत.

* त्यामुळे आजवर परदेशी बनावटीच्या विमानावर अवलंबून राहणाऱ्या भारतातही नजीकच्या काळात विमाननिर्मितिचा मार्ग सुकर झाला आहे.

* मूळच्या सातारा येथील आणि सध्या मुंबईत असलेल्या कॅप्टन अमोल यादव याने १९९८ मध्ये आपल्या थ्रस्ट एअरक्राफ्ट कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावाहिल्या विदयुतनिर्मितीचा प्रयत्न सुरु केला आहे.

* या विमानाला मान्यता मिळविण्यासाठी यादव यांनी २०११ साली डीजीसीए कडे अर्ज केला त्यांनी थट्टा करून तो बाजूला टाकला.

* नंतर बीकेसीच्या वांद्रे संकुलात परवानगी नसतानाही आपले विमान प्रदर्शनात मांडले त्याची देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.

* अशा कठीण परिस्थितीत जाऊन त्यांना आता विमान निर्मितीचा परवाना मिळाला आहे. हे १९ आसनी छोटे विमान असून त्याची निर्मिती केली जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.