शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

१.४ विकासाचे आर्थिक निर्देशांक

१.४ विकासाचे आर्थिक निर्देशांक 

१] वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात वाढ - वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात जसजशी वाढ होत जाईल, तसतसा त्या देशाचा आर्थिक विकास होत जातो. दीर्घ नियोजन काळात अशा उत्पन्न वाढीचा वेगही वाढत असतो. आणि विकासाचा तो सर्वात महत्वाचा सूचक असतो. ज्या देशांचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक असते. त्यांना विकसित देश संबोधले जाते. जर ज्यांचे राष्ट्रीय उत्पन्न कमी असते त्यांना विकसनशील देश म्हणून ओळखले जाते. 

२] दरडोई उत्पन्न - दरडोई उत्पन्नात देशाच्या विकासाबरोबर वाढ होत जाते. लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा जर राष्ट्रीय उत्पन्नवाढीचा वेग जास्त असेल तर दरडोई उत्पन्न वाढते. लोकसंख्या स्थिर असेल व राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ होत असेल तर तेव्हासुद्धा असाच परिणाम होतो. अमेरिका, नॉर्वे,स्वित्झर्लंड या देशांशी तुलना केली असता भारत, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या अल्पविकसित देशामध्ये आपल्याला कमी दरडोई उत्पन्न पाहायला मिळेल.  भारताचा दरडोई उत्पन्न वाढीचा दर ३.५% होता. तो २००४ मध्ये १०.७% होता. 

३] राहणीमानात वाढ - राष्ट्रातील मानवाच्या राहणीमानात योग्य वाढ होत असेल. तर तोसुद्धा एक आर्थिक विकासाचा महत्वाचा मानक ठरविला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या २००७ च्या मानवी विकास अहवालांतर्गत भारताचा जगात १७७ देशांच्या यादीमध्ये १२८ वा क्रमांक होता. तर भारताच्या तुलनेत आइसलँड, नॉर्वे, व ऑस्ट्रेलियाचा यांचा अनुक्रमे १ ला, २ रा, व ३ रा क्रमांक होता. 

४] अनुकूल व्यापारशेष - अनुकूल व्यापारशेष हासुद्धा एक आर्थिक विकासाचा महत्वाचा मानक मानला जातो. आर्थिक विकासाचा दर जसजसा वाढत जाईल तसतसे त्या देशाचे आयात व्यापाराचे प्रमाण कमी होत जाईल. भारताच्या स्वातंत्र्यापासून फक्त १९७२-७३ व १९७६-७७ ही वर्षे वगळता भारताचा व्यापारशेष हा सतत प्रतिकूल राहिलेला आहे. 

५] औद्योगिकरण - देशात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले म्हणजे औद्योगिक वस्तूच्या बाबतीत परालंबीत्व कमी होते. आवश्यक त्या वस्तू देशालाच प्राप्त होतात. त्यामुळे एक प्रकारे परकीय चलनाची बचत होते. ज्या देशात उद्योग क्षेत्रात अधिक लोकसंख्या गुंतलेली असते तो देश प्रगत मानला जातो. 

६] मानवी साधनसंपत्तीचा दर्जा - मानवी साधनसंपत्तीचा दर्जा उच्च असणे हे विकसित अर्थव्यवस्थेत महत्वाचे लक्षण होय. मानवी साधनसंपत्तीचा दर्जामध्ये जन्म व मृत्युदर, लोकसंख्येची घनता, आयुर्मानात वाढ ही लक्षणे आढळतात. UNDP २०१० च्या HDI अहवालात माध्यम मानवी विकास निर्देशांकाच्या देशांच्या यादीत भारताचा १२६ वा क्रमांक होता. 

७] रचनात्मक परिवर्तन - प्राथमिक किंवा शेतीक्षेत्राकडून उद्योग क्षेत्राकडे व उद्योग क्षेत्राकडून सेवाक्षेत्राकडे अर्थव्यवस्थेचे होणारे स्थलांतर अर्थव्यवस्थेची स्थिती आणि दिशा स्पष्ट करते. भारताच्या अर्थव्यवस्थेत असे रचनात्मक परिवर्तन मोठ्या प्रमाणात घडून आले. 

८] आंतरराष्ट्रीय आर्थिक विस्तार - जागतिकीकरणामुळे देशा-देशामधील परास्वरालंबीत्व वाढले. आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, व पर्यावरणपूरक क्षेत्रातील परस्परसहकार्य ही विकासाची एक महत्वाची अट ठरली आहे. 

९] इतर आर्थिक निर्देशांक - यात भांडवल-उत्पादन गुणोत्तर, आयात निर्यात बदलते स्वरूप, ऊर्जेचा वापर या निर्देशांकाचाही विचार केला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.