गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

देशात उत्तर प्रदेशचा गुन्हेगारीत प्रथम क्रमांक - १ डिसेंबर २०१७

देशात उत्तर प्रदेशचा गुन्हेगारीत प्रथम क्रमांक - १ डिसेंबर २०१७

* खून, बलात्कार तसेच महिलांवरील होणाऱ्या अत्याचऱ्यासारख्या गंभीर गुन्ह्यात उत्तर प्रदेश हे राज्य देशात अव्वल असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेच्या [एनसीआरबी] वार्षिक अहवालाद्वारे उघड झाली आहे.

* त्याच्याच जवळचे बिहार राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात गेल्यावर्षी २०१६ मध्ये ४ हजार ८८९ खुनाच्या घटनांची नोंद झाली असून हे प्रमाण देशाच्या १६.१% आहे.

* त्यापाठोपाठ बिहारमध्ये खुनाच्या २ हजार ५८१ घटना समोर आल्या असून हे प्रमाण ८.४% आहे. गेल्यावर्षी उत्तर प्रदेशात महिलांशी संबंधित ४९ हजार २६२ [१४.५]% गुन्ह्याची नोंद झाली आहे.

* पश्चिम बंगालमध्ये अशा प्रकारचे ३२ हजार ५१३ [९.६] गुन्हे नोंदविले आहेत. देशभरात बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

* त्यापाठोपाठ महाराष्ट्रात ४ हजार १८९ गुन्हे दाखल झाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.