बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

दिल्लीत २०१८ पासून धावणार बीएस-६ ग्रेडची वाहने - १६ नोव्हेंबर २०१७

दिल्लीत २०१८ पासून धावणार बीएस-६ ग्रेडची वाहने - १६ नोव्हेंबर २०१७

* दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने अतिशय कमी प्रदूषण करणारी [बीएस-६] युरो ग्रेडची पेट्रोल व डिझेल वाहने रस्त्यावर आणण्याचा कालावधी दोन वर्षे अलीकडे आणला आहे.

* ही वाहने एप्रिल २०१८ पासून दिल्लीतील रस्त्यावर धावतील. भारतात सध्या [बीएस-४] ग्रेडची डिझेल पेट्रोलची वाहने रस्त्यावर धावत आहेत.

* एप्रिल २०२० पासून बीएस-६ ग्रेडची वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय सरकारने २०१५ मध्ये घेतला होता. दिल्लीत मागील काही काळात प्रदूषित धुक्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

* जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये दिल्लीचा समावेश झाला आहे. यामुळे बीएस-६ ग्रेडची वाहने रस्त्यावर आणण्याचा कालावधी दोन वर्षे अलीकडे आणण्याचा निर्णय घेतला आहे.

* ही वाहने एप्रिल २०१८ पासून दिल्लीत धावतील अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.